
नागपूर कोरोना अपडेट :
नागपूर दि. 29 :- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण हे 79.33 टक्के असून नागपूरकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आज 1418 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर 1215 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (77030) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 61115 झाली आहे.
एकूण क्रियाशील रुग्ण 13443 आहेत. आज 34 मृत्यु झाले असून त्यापैकी 8 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79. 33टक्के आहे.