
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक.०१/१०/२०२० रोजी सर्वत्र कोरोना कोविड – १९ या रोगाची महामारी सुरु असून हा रोग संसर्गजन्य रोग आहे.यामुळे भयावह वातावरण बघावे त्या ठिकाणी पसरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये असलेल्या कोविड सेंटर मधील कॉरनटाईन असलेला एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातुन धाव घेत पसार झाला.याबाबत ची तक्रार चिमूर पोलीस स्टेशन ला झाली असून पोलीसांची पसार झालेल्या कोरोना बाधित रुग्णाची शोध मोहीम सुरू आहे.याबाबत चिमूर शहरात सर्वत्र माहिती पसरली असून चिमूर शहरात तसेच चिमूर तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.