
कॅन्डल मार्च काढून मृतक मनीषा वाल्मीकी ला दिली श्रद्धांजली.
नागपुर :- नागपूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या दवलामेटी येथे नागरिकांनमध्ये हाथरस गँगरेप प्रकरणी मारेकरान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ वाटकर व पं. स सदस्य सुधिरभाऊ करंजेकर यांचा नेतृत्व परिसरात कॅन्डल मार्च काढून मृतक मनीषा ताई ला श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या गुन्ह्यात प्रत्यक्ष क्यू वा अप्रत्यक्ष सामील असलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी दवलामेटी शाखेचा वतीने प्रशासनाला करण्यात आली.
हाती मेणबत्ती घेऊ काढण्यात आलेले शांती मार्च परिसरातील सर्व बौद्ध विहार , मंदिरे इथे मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आले. शांती मार्च तक्षशिला बौध्द विहार येथून सायंकाळी काढण्यात आली व समारोप आठवा मैल चौक येथे समारोप करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ वाटकर आणि पंचायत समिती सदस्य सुधिर भाऊ करंजेकर यांचा नेतृत्वात , तालुका अध्यक्ष अतुल शेंडे, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, माजी ग्राम पंचायत सदस्या शीला रंगारी, संदीप सुखदेवे, नितीन रामटेके, श्रीकांत रामटेके, रोहित राऊत , प्रवीण अंबादे , सोनू बोरकर, स्वपनील चारभे, समीर सहारे, पियूष लांजेवार, राहुल बुरबुरे, नितेश पुंडकर, अनवर अली, वामन वाहने, छत्रपती शेंद्रे, गौतम खोब्रागडे, ईश्वर राऊत, लता नाईक, प्रीती वाकडे, उषा चारभे , मीना गजभिये, कुंदा लांजेवार तसेच दवलामेटी शाखेचे ईतर पदाधिकारी , कार्यकर्ते, महीला आघाडी, युवा आघाडी उपस्थित होते.