
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- वरोरा तालुक्यामधिल दहेगाव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आलेल्या मासिक सभेत फेरफार का करण्यात आला नाही म्हणून गावातील युवक विजय खिरटकर यांनी ग्रामपंचायतचे सचिव तुळशीदास लांजेवार यांची गाडी अडवून गाडीची चावी हिसकावून मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये कलम ३५३ व इतर कलमान्व्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पण त्यांना अटक केली नसल्याने ग्रामपंचायत सचिव संघटनेत रोष व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८/९/२०२० ला सकाळी ९:३० ला नियमित मासिक सभा ग्रामपंचायत सरपंच विशाल पारखी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. विशेष म्हणजे तुळशीदास लांजेवार या ग्राम सचिवाला माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेवर दुसऱ्या गावी ऑक्सिजन टेस्ट व टेमरेचर टेस्टसाठी जायचे आदेश होते, त्यामुळे मासिक सभा उरकून ते आपल्या मोहिमेवर निघणार होते मात्र विजय खिरटकर यांनी आम्हच्या जागेचे फेरफार करा म्हणून म्हणून हट्ट पकडला.
मात्र अपुरे कागदपत्र असल्याने सरपंच विशाल पारखी यांनी पुढच्या मासिक सभेत हा ठराव घेवू म्हणून म्हणून समजूत काढली पण तरीही त्यांनी सूर्यभान खिरटकर व इतर गावकऱ्यांना घेवून येवून मासिक सभा ऊरकल्या नंतर ग्रामसेवक तुळशीदास अंजेकर यांची दोनचाकी गाडी अडवली व शिवीगाळ केली आणि गाडीची चावी काढली, ज्यामुळे ग्रामसेवक यांना शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेवर जाता आले नसल्याने त्यांनी वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली त्या तक्रारी वरून विजय खिरटकर यांच्या विरोधात कलम ३५३ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले पण पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने ग्रामसेवक संघटना संताप व्यक्त करीत आहे.