Breaking News

अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यातील  ब्रम्हपुरी तालुक्यामधिल खरकाडा येथील व्यायाम करण्याकरिता आज पहाटे गेलेल्या दोन युवकांना सकाळच्या पहाटे साडेचारच्या दरम्यान विद्यानगर रुई जवळ अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ९ ऑक्टोबर घडली असून यात खरकाडा येथील प्रशांत मुरलीधर सहारे (वय २०) व रोहित अशोक चट्टे (वय २० ) असे दोघा मृतकांचे नावे आहेत.

नेहमीप्रमाणे प्रशांत सहारे व रोहित चट्टे हे खरकाडा वरून आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाक करिता खरकाडा ते आरमोरी मार्गावर जात होते आज ९ ऑक्टोंबरच्या सकाळच्या पहाटे विद्यानगर रुई जवळील राईस मिल जवळ रस्त्याच्या कडेला प्रशांत व रोहित हे दोघेही व्यायाम करीत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. यात दोघांचाही मृत्यू झाला.काही मित्र पुढे गेले होते प्रशांत, रोहित हे एकत्र राहायचे प्रशांत व रोहितच्या अपघाती मृत्यू खरकाडा गावात शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी चे ठाणेदार खाडे, एपीआय बन्सोड व बीट जमादार गेडाम घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेले. अज्ञात वाहनाचा शोध लावण्याची मागणी या वेळी उपस्थितांनी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved