
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक.०९/१०/२०२० ला सायंकाळी ०६:०० वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विलास डांगे यांच्या राहत्या घरी वणी येथील जनता विद्यालयाचे शिक्षक प्रकाश झाडे , व निलेश भालेराव हे दोघेही घरात घुसले व प्रकाश झाडे यांनी सरळ शिवीगाळ सुरू केली तू माझी रेतीची तक्रार करतोस आणि जिल्हाधिकारी , उप विभागीय अधिकारी , पोलीस अधिक्षक ,तहसीलदार ,यांना माझ्या रेती बाबतची तक्रार केली. व माझी तक्रार ठाणेदारास सुद्धा केली यापुढे रेतीची तक्रार केलास तर जीवानिशी मारून टाकीन अशी धमकी देत घरा बाहेर निघाला व त्यांच्या सोबत असलेला निलेश भालेराव पण गेला असता विलास डांगे यांनी घराबाहेर व्हरांड्यातून बघितले तेव्हा इनोव्हा या वाहनात बसत असतांना जातेवेळी यानंतर तुनं रेती घाटाच्या तक्रारी केलास तर भेटशील तिथे जीवानिशी मारून टाकीन अशी धमकी प्रकाश झाडे देत निघून गेला.
अशी तक्रार चिमूर पोलीस स्टेशन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विलास डांगे यांनी केली. असता ठाणेदार यांना याबाबतची पोलीस हवालदार यांनी माहिती देऊन सुद्धा ऑनलाइन तक्रार तात्काळ दाखल करायला हवी असतांना तक्रार दाखल न करता लेखी तक्रारीची (ओ.सी.)कॉपी देऊन फिर्यादिस जाण्यास सांगितले.मात्र या घटनेची दखल घेत या आशयाची बातमी काल प्रकाशित केली असता बातमीची दखल घेऊन आज दिनांक.११/१०/२०२० ला चिमूर पोलिसांनी आरोपी शिक्षक प्रकाश झाडे तसेच साथीदार निलेश भालेराव यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ४४८ , २९४ , ५०४ , ५०६ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे शेवटी काँग्रेस कार्यकर्त्यास न्याय मिळाला आहे.