
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीतील रिंगनाबोडी शिवारातील ईगल रिसोर्ट येथे १४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर (ग्रा.) पोलिस विभागाच्या गुन्हे अन्वेशन विभागाकडून घालण्यात आलेल्या धाडीत ३६ जुगार्यांना अटक करून त्यांच्याकडून ४२ लाख ७३ हजार ३२0 रुपये जप्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील पोलिसांनी अवैध धंद्यांवर मुसक्या आवळताच अवैध व्यावसायिकांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला. यात ग्रामीण भागातील रिसोर्ट्स आणि फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलिस अधिकार्यांना लागली. त्याअंतर्गत १४ व १५ ऑक्टोबरच्या रात्री नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून नागपूर पासून-अमरावती महामार्गावरील कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीत ४२ कि.मी. व महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रिंगणाबोडी शिवारातील कोंढाळीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ईगल रिसोर्टवर धाड टाकली.
या कारवाईत या रिसोर्टवर जुगार खेळणार्या बादल रमेश कारेमोरे (३२) रा. येरखेडा, किशोर महादेव धकाते (५३) रा. मौदा, राधेश्याम तेजराम निनावे (४५) रा. मौदा, मोरेश्वर तेंनीचांद सोरते (४६) रा. मौदा, रूपेश भास्कर निमजे (२७) रा. मौदा, दत्त डोमाजी वाडकर (४२) रा नागपूर, रामचंद्र रामकृष्ण निखारे (४२) रा. मौदा, सैय्यद अजरुद्दीन बशिरुद्दीन (३३) रा. पवनी, भंडारा, अश्विन कुलदीप मेर्शाम (२३) पवनी भंडारा, राजेंद्र नरेंद्र दामाहे (४३) रा. भंडारा, सचिन गणेश वैद्य (४0) रा.नागपूर, घनश्याम तुकाराम चाफले (३२) रा. मौदा, सतोषा रामचंद्र बावणकर (४२) रा. तिरोडा, मालेश्वर रामाराव कोरोपाडे (३0) तिरोडा, जॉनी ऊर्फ मुन्ना व्यंकटेश चलसानी (४३) रा. मौदा, शरद नामदेव भोयर (४२) रा. मौदा, फिरोज ऐहमद खान (४२) मौदा, तीर्थराज लालाजी दुपारे (५५) रा. शहापीर भंडारा, श्रीनिवास व्यंकतेशवर राव येरमनेनी (५८) मौदा, राजू रचमचंद्र कापसे (३९) रा. तिरोडा, ज्ञानेश्वर झामाजी बारापात्रे (४८) मौदा, पुरुषोत्तम सोमाजी काटकर (३१) रा. मौदा, अतुल उत्तम रामटेके (३0) रा. फुलमोगरा भंडारा, नीलेश ओमप्रकाश कावळे (३0) रा. मौदा, राजेश बेनिराम निमजे (३0) मौदा, त्रिभुवन कोठीराम दंडारे (२८) रा. पवनी, मंगेश अरुण हटवार (२८) नागपूर, गणेश रमन राठी (३५) रा. आर्वी, सारंग मदन थिगळे (२९) रा. आर्वी, सुरेंद्र कृष्णा अंबीलडूके (३0) रा. मौदा, हगरू ऊर्फ राजू तोलाराम नंदेशवर (४८) गांगला तिरोडा, ओम बाळू हटवार (३२) रा. भंडारा, ओंकार हिरालाल हुरे (३0) रा. पवनी, एन्ना नालापोटला आदे (३५) गुत्तुर तेलंगणा, विलास हरीश बावणे (३६) रा. तिरोडा, अशोक पांडुरंग वंजारी (५५) रा. मौदा यांना ईगल रिसॉर्टच्या आवारात जुगार खेळत असताना नागपूर गुन्हेशाखेचे व कोंढाळी पोलिसातील अधिकारी व कर्मचार्यांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले.
यावेळी जुगार खेळात बावण पत्ते कार्डचे चार सेट आणि दोन लाख ४८ हजार ७२0 रुपये आणि सर्व ३६जुगार खेळणार्यांना ताब्यात घेऊन ३६ मोबाईल सेट, ८ चारचाकी वाहने असा एकूण ४२ लाख ७३ हजार ३२0 रुपयांचे एकूण मुद्देमाल जप्ती केल्याची माहिती कोंढाळी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. सदर जुगार अड्डय़ावर नागपूरचे पोलिस अधिकारी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे आणि त्यांची चमू व कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी कारवाई केली आहे. या भागात अनेक ठिकाणी जुगार अड्डे संचालित होत असल्याची चर्चा जोरात आहे. नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून कोंढाळी भागात अनेक अवैध दारू अड्डय़ांवर धाडी घातली गेल्याचे सांगितले जाते.