
नागपुर :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपुज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दिक्षाभुमी नागपुर येथे 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपनाने साजरा करण्यात आले.
दिनांक 14 ऑक्टोंबर 1956 रोजी विजयादशमीला परमपुज्ज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरच्या पवित्र दिक्षाभुमी वर सकाळी 9 वाजता पुज्य महास्थविर चंद्रमणी यांचेकडुन त्रिशरण व पंचशील ग्रहण करुन धम्मदिक्षा घेतली. त्या प्रसंगाची स्मृती म्हणुन यावर्षी देखील अशोक विजयादशमी दिनांक 25 ऑक्टोंबर 2020 ला सकाळी 08.30 वाजता दिक्षाभुमी वर तथागत गौतम बुध्द व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला माल्यार्पण पुज्य भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. व सामुहीक बुध्द वंदना घेवुन भिक्शुसंघातर्फ बुद्ध गाथेचे पठन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ सुधीर फुलझेले सचिव, श्री ना.रा.सुटे सदस्य, अँड आनंद फुलझेले सदस्य, श्री विलास गजघाटे सदस्य, व डॉ. बी.ए. मेहेरे प्राचार्य डॉ आंबेडकर महाविद्यालय उपस्थित होते. यावेळी समता सैनीक दलाकडुन मानवंदना देण्यात आली.