
नागपूर, दि. 28 : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांचे गुरुवार, दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा दहाला नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्यांचा शहरातील निवासस्थानी मुक्काम राहील.
शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित व्हर्च्युअल कोर्ट फार ट्रान्सपोर्ट विभागाच्या न्याय कौशल ई-रिसोर्स उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील.
रविवार, 1 नोव्हेंबर रोजी दुपारी चारला विमानाने नागपूर येथून दिल्लीकडे प्रयाण करतील.