Breaking News

वाघिणीच्या एका पिल्लांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- ताडोबा प्रकल्पातील बफर क्षेत्रात वनकर्मचारी गस्त घालीत असतांना त्यांना तीन वाघाचे बछडे (पिल्ले)अस्वस्थ अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता एका पिल्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून दोन पिल्लावर उपचार सुरू आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलय खडसंगी (बफर) अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र खडसंगी -3 कक्ष क्र.५३ मध्ये क्षेत्रीय कर्मचारी गस्तीवर होते. गस्ती दरम्यान तीन वाघिणीचे पिल्ले कर्मचाऱ्यांना अशक्त स्थितीत आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनी पिल्लांचा मागोवा घेतला असता त्यांचातील एक बछडा अत्यंत गंभीर स्थितीत असल्याचे निदर्शनास आले, त्यांना उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रावर नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांनी दिलेल्या sop नुसार आज त्या मृत बछड्याचा शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. आज वनकर्मचारी (बफर) चे गस्तीवर जाऊन म्युरीच्या अजून दोन बछड्याचा मागोवा घेतला असता ते पण अशक्त स्थितीत आढळून आले आहे. त्या बछड्याना सुद्धा वनकर्मचार्यानी पकडून आज उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे नेण्यात आले असून, सध्या त्या मयुरीच्या दोन बछड्यावर उपचार सुरु आहे. खडसंगी वनपरिक्षेत्राअंतर्गत चे क्षेत्रीय कर्मचारी व विशेष व्याघ्र संरक्षण दल यांचे मार्फत त्या तीन बछड्याच्या आईचा मयुरी (वाघीण) शोध घेणे सुरु आहे. सदर कारवाही उपसंचालक (बफर) व सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली खडसंगीचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे हे करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved