
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमुर :चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग एक मध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा मागील तीन दिवस पासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर परिषद प्रशासन मात्र उडवाउडवीची उत्तरे देत आहे तेव्हा नगर परिषद प्रशासन ने लक्ष घालून नळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी भाजपचे शहर महामंत्री सुरज नरुले यांनी केली आहे .
चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग एक म्हणजे काडकुडनगर व प्रभाग क्रमांक तीन म्हणजे जुनी वडाळा पैकू वस्ती आहे या दोन प्रभागाचे नेतृत्व नप उपाध्यक्ष तुषार शिंदे व विरोधी गट नेते छाया कनचलवार नेतृत्व करीत आहे परंतु या दोन्ही प्रभागाकडे दुर्लक्ष करीत आहे प्रभागातील समस्या वर तोडगा काढीत नसल्याने जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यातील एक ज्वलंत समस्या म्हणजे नळा द्वारे पाणी पुरवठा असताना अनियमित पाणी पुरवठा होत आहे कधी गढूळ पाणी पण येत असते त्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक आहे तेव्हा पाणी पुरवठा व इतर समस्या सोडवण्यासाठी नप ला वारंवार पत्र व्यवहार करीत असताना मात्र नप प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
मागील तीन दिवसांपासून नळ पाणी पुरवठा बंद आहे तेव्हा पाणी पुरवठा कर्मचारी यांना विचारणा केली असता मागील पाण्याची टाकी नऊ महिन्यापासून स्वच्छ केली नसून सीडी तुटली आहे कर्मचारी यांनी नप च्या वरिष्ठ पाणी पुरवठा विभागास सांगून सुद्धा ते लक्ष देत नसल्याचे सांगितले त्यामुळे पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती समोर आली आहे नप मधील शासन कर्ते सुद्धा वेळ काढू धोरण अवलंबित आहे .
नगर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रभाग एक व तीन मधील पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी भाजप महामंत्री सुरज नरुले यांनी केली आहे.