
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चिमूर :- रविन्द्र शिंदे यांनी चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला आहे. चिमूर येथे पोलिस निरिक्षक स्वप्निल धुळे कार्यरत असताना चंद्रपुर जिल्ह्यातील पोलिस निरिक्षक व उप पोलिस निरिक्षकासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे बदलयांचे सत्र नुकतेच पोलिस अधिक्षकांनी राबविले, बदली झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे सांगण्यात आले, सदर आदेशावरुन अनेक अधिकारी व कर्मचारी रुजू झालेत, मात्र चंद्रपुर शहर पोलिस ठाण्यातुन चिमूर पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस निरिक्षक बहादुरे यानी चिमूर क्रांतिभूमित येण्यास नकार दर्शविला, व त्यानी वरीष्ठांकडे विनंती अर्ज करून मुख्यालयताच आर्थिक गुन्हे शाखेत आपली वर्णी लाऊन घेतली, दुसरीकडे चिमूरचे ठाणेदार स्वप्निल धुळे यांचा कार्यकाल संपन्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने त्यानांच येथे कायम ठेवावे असी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे यांचे बदलिने व ठाणेदार बहादूरे यांच्या नकारामुळे 6 दिवसाचा कालावधि होऊन सुधा चिमूर मधे कोनतेच पोलिस अधिकारी आले नाही अशातच दिनांक 6 नोव्हेबर ला नाशिक येथून आलेले पोलिस निरिक्षक रविन्द्र मुक्ताराम शिंदे यांनी चिमूर पोलिस स्टेशनचा ठाणेदार पदाचा कार्यभार स्विकारला, यावेळी ठाणेदार शिंदे यांनी चिमूर परिसरातील माहिती अधिकाऱ्यांकडून जानून घेतली.
या पूर्वी नाशिक पोलिस स्टेशनला पोलिस निरिक्षक रविन्द्र शिंदे कार्यभार सांभाळत होते, या आधी त्यानी गोंदिया, गडचिरोली येथे सुद्धा शाषणाच्या निर्देशाचे प्रभाविपने अंमलबजावणी केली, ठाणेदार रविन्द्र शिंदे हे चिमूर परिसरात नवीन असल्याने त्याना येथील भौगोलिक परिस्थिति, संवेदनशील गाव, लोकांची मानसिकता ओळखून कामें करताना चांगलेच परिश्रम घ्यावे लागणार आहे, नवीन ठाणेदार यांना अवैध व्यवसायीकांचे मोठे आवाहन असणार आहेत, ते कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांच्या लक्ष आहे.