
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – दिनांक.१०/११/२०२० चिमूर नगर परिषदेच्या १७ प्रभागांकरिता २०२० चे आरक्षण तपशील जाहिर करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक.१) मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव , (२) सर्वसाधारण महिला (३) अनुसूचित जाती ( महिला ) (S.C) , (४) अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) ,(S.T) (५) सर्वसाधारण , (६) सर्वसाधारण ( महिला ) , (७) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( सर्वसाधारण ), (८) सर्वसाधारण (९) अनुसूचित जमाती (महिला) (S.T) (१०) सर्वसाधारण (११) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( सर्वसाधारण ) (१२) अनुसूचित जमाती ( महिला ) (S.T) , (१३) सर्वसाधारण (१४) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) (१५) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) (१६) सर्वसाधारण ( महिला ) (१७) अनुसूचित जाती ( महिला )
अशाप्रकारे १७ प्रभागांमधील आरक्षण तपशील जाहिर करण्यात आले. हि आरक्षण सोडत उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ , चिमूर नगर परिषद चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर , व अन्य पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी चिमूर वासी नागरिक तथा नगर सेवक व सर्व पक्षीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.