
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नुकत्याच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या असल्याने अवैधरीत्या धंदे करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसलेला आहे. दुर्गापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांची बदली वरोरा येथे झाल्याने त्यांच्या जागी चिमूर पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांची वर्णी लागली.
धुळे यांच्या हद्दीत अवैध व्यावसायिकांना धंदे करण्यास पाणी प्यावे लागतं, आता तेच स्वप्नील धुळे दुर्गापूर पोलीस स्टेशनचाप्रभार घेतल्यावर अवैध धंद्यांवर लगाम लावण्यास प्रारंभ केलाआहे.
9 नोव्हेम्बरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास पद्मापूर वनविभाग गेटजवळ अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलीस स्टेशनला मिळाली होती. दुर्गापूर पोलिसांनी सापळा रचत चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. 03 सी.एस 9066 ला थांबविण्यात आले, वाहनांची तपासणी केली असता त्या गाडीत 2900 नग किंमत 2 लाख 90 हजार देशी दारूच्या निपा आढळून आल्या. पोलिसांनी एकूण 5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक मंजुळकर, प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, उमेश वाघमारे, मनोहर जाधव, संतोष आडे व मंगेश शेंडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.