
नागपूर :- कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स, पोलीस,सफाई कर्मचारी मोलाचे योगदान देणार्या पत्रकाराचा सुध्दा सत्कार माजीमंत्री रमेशचंद्रजी बंग यांच्याहस्ते आज दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी हिंगणा तालुक्यातील स्व.देवकीबाई बंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिवाळीचे औचित्य साधून, कोरोना काळात स्वत:सह परिवाराच्या जिवाची चिंता न करता पत्रकारांनी वृतसंकलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यासह कोरोना प्रादुर्भावच्या दैनंदिन स्थिती बाबतची माहिती प्रकाशित करून जनतेला जागरूत केल्याचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल जि.प. सदस्य दिनेश बंग यांच्या वतीने व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते हिंगणा तालुक्यातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाने बंग परिवाराच्या वतीने गेले अनेक वर्षा पासुन उल्लेखनीय समाज कार्य करणार्यांचा सत्कार व कौतुक करण्याची परंपरा दिनेश बंग यांनी कायम ठेवली असल्याचे मत जेष्ठ पत्रकार नरेंद्र कुकडे यांनी व्यक्त केले. वेळी हिंगणा पं.स.सभापती बबनराव अव्हाले, जि.प. सदस्य दिनेश बंग, राकाँपा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, राकाँपा जिल्हा संघटक सुशील दिक्षित,राकाँपा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा फुलकर, राकाँपा नेते महेश बंग पंचायत समिती सदस्यां अनुसयाताई सोनवणे,प्रमोद फुलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सत्कारमूर्ती मध्ये प्रा.सतीश भालेराव, विनायक इंगळे, गजानन ढाकुलकर,रोशन कापसे, मधुसूदन चरपे,आशिष गोंडाने, सुभाष वराडे, रमेश पाटील,मधुकर राजदकर, रवींद्र कुंभारे,गणेश धानोरकर, मनोज झाडे, नरेंद्र कुकडे, राजेंद्र सांभारे, अजय धर्मपूरिवार,संजय खडतकर, सोपान बेताल, पियुष पोकळे, लीलाधर दाभे, अनिल इंगळे, वअलीम महाजन, ,देवेंद्र शिरसाट, जितू वाटकर,चंदू कावळे, जानकीराम वानखडे आदीं पत्रकारांचा समावेश होता.