
नागपुर :- भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती प्रित्यर्थ मनपा मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासिक इमारतीमध्ये पं.जवाहरलाल नेहरु यांच्या छायाचित्राला अतिरिक्त आयुक्त श्री संजय निपाने, सहाय्यक आयुक्त श्री महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, आणि राजेश वासनिक यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने विनम्र अभिवादन केले.