
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – भद्रावती परिसरात पेट्रोलींग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली एक व्यक्ती नामे आनंद विश्वकर्मा हा होंडा अक्टीवा गाडीने सुमठाना भद्रावती परिसरात संशयास्पदरित्या फिरत असुन त्याच्या जवळ असलेली गाडी चोरीची आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती आधारे तात्काळ असलेल्या ठिकाणी पोहचुन त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.
सदर व्यक्तीने गाडी चोरीची असल्याची कबुली दिली, त्याचे ताब्यातील गाडी होंडा अँक्टीवा एम एच ३४ बी एम ९६९४ क्रमांकाची गाडी त्याने त्याच्या साथीदारासह पोलीस स्टेशन वरोरा येथुन सन २०१८ मध्ये चोरी केली होती. यावरुन पोलिसांनी आरोपी आनंद विश्वकर्मा याला ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या साथीदाराने या गाडी व्यतिरीक्त चंद्रपुर जिल्ह्यातील दुचाकी गाडया चोरी केल्या आहे.सदर आरोपी आणि त्याचे इतर तिन साथीदार यांचे कडुन वरणी येथील १) होंडा अँक्टीवा, २) होंडा शाईन, पोस्टे यवतमाळ येथील ३) बजाज पल्सर, पोस्टे सोनगाव नागपुर येथील ४) बजाज डिस्कवर, पोस्टे रामनगर येथील ५) टिव्हीएस स्कुटीपेप, पोस्टे वरोरा येथील ६) होंडा अक्टीवा, आणि ०१ हिरो पॅशन प्रो, ०१ होंडा स्प्लेंडर, ०१ हिरो पॅशन प्रो प्लस असे एकुण ० ९ दुचाकी किं. ३,४१,००० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर एकुण ४ आरोपी नामे १) गौरव गजानन चितांवार वय २१ रा. भद्रावती, २) अनिकेत प्रमोद लांडगे वय २३ रा. खांबाळा, ३) आनंद जयप्रकाश विश्वकर्मा वय २५ रा. सुमठाणा भद्रावती, ४) राहुल लक्ष्मण राम वय २१ रा सुमठाणा भद्रावती यांना पोलीस स्टेशन वरोरा येथे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर पोलीस निरिक्षक खाडे यांचे नेतृत्वात सपोनि. जितेंद्र बोबडे, सफौ, पंडीत वन्हाटे, पोना, मनोज रामटेके, पोना. गजानन नागरे, पोशि, विनोद जाधव, पोशि, सुरेंद्र महतो यांनी पार पाडली.