Breaking News

सुचनांचे पालन न केल्यास चिमूर पोलिसांनी दिले कडक कारवाई करण्याचे संकेत

जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर

चिमूर :- वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्ग चिमूर शहराला लागूनच आहे त्यामुळे दुकानदार धारकांनी अतिक्रमण करून आपले दुकाने अगदी रस्त्यावर थाटले आहे. त्यामुळे चिमूर पोलिसांनी आज दि. २१/११/२०२० रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे ( भा.पो.से.) यांचे उपस्थितीत चिमूर पोलीस स्टेशन येथील Api मंगेश मोहोड, Psi अलीम शेख व पोलीस कर्मचारी यांनी धडक मोहीम राबवून चिमूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळे निर्माण करणारे दुकान, वाहने, ठेले, भाजीपाला दुकान हे रस्त्याचे बाजूला करून नो पार्किंग वाहनांवर कारवाई करण्यात आली.

तसेच दुकानदार व नागरिकांना रस्त्यावर दुकान व वाहने न लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यापुढे सूचनांचे पालन न केल्यास कडक कारवाईचे चिमूर पोलिसांनी संकेत दिले.पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरीकांन कडून सर्वत्र स्वागत होत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved