Breaking News

कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना मिळाली “मायेची उब”

नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना थंडीचे कपडे, स्वेटर व ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 200 कुटुंबांची मदत करण्यात आली आहे. यात फुटपाथवर रहाणारे विक्रेते, झोपडपट्टीतील नागरीक, मांग गारुडी समाजातील विद्यार्थी, विधवा व निराधार महिलांचा समावेश आहे.

 

रविवारी महालक्ष्मी मंदिर कोराडी येथील भिक्षेकर्‍यांना थंडीचे कपडे व ब्लॅंकेट वितरीत करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी वाढली आहे. या मंदिरात येणार्‍या भाविकांवर आश्रित असलेले भिकारी मोठ्या आशेने येथे येणार्‍या भक्तांकडे पदर पसरतात. त्यांची हीच गरज ओळखून फोरमने कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना थंडीचे कपडे वितरीत केले.

यावेळी या अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी, यांच्यासह अभिजित सिंह चंदेल, गजेंद्र सिंह लोहिया, अभिजित झा, विकास चेडगे, अमित बांदूरकर, वैभव पाटील व अमृता अदावडे आदी सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved