
- मास्क न घालणाऱ्या १७ व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल
- ४ लाख ३३ हजार रुपयाचा दंड वसुली
नागपूर :- मास्क व सोशल डीस्टसिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ८०६ व्यक्तीकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम ५०० रुपये ऐवजी एक हजार रुपये करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे, जनतेने नियमाचे कठोर पालन करणे अपेक्षित आहे, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण वाढत आल्यामुळे जनतेनी सामाजिक अंतर व मास्क वापरण्या सोबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.