Breaking News

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी अनिवार्य

नागपूर दि २४ : नागपूरसह देशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज जारी केलेल्या आदेशान्वये परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही चाचणी अनिवार्य राहणार आहे. उदया बुधवार २५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज यासंदर्भात अधिकृत आदेश जाहीर केले आहेत.

जगात, भारतात तसेच नागपूर जिल्हा व शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्य शासनाने देखील यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याला अवगत केले आहे. प्रामुख्याने दिल्ली एनसीआर क्षेत्र, राजस्थान,गुजरात आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणारी एक चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूने नागपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने काटोल व नरखेड मार्गाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची यादी रेल्वे विभागाकडून प्राप्त करून आरटीपीसीआर अहवाल तपासणी बाबतची कारवाई करावी, असे या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच सावनेर, नरखेड, रामटेक या रस्ते मार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रावर तपासणी चौकी तयार करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहे.

कोरोना आजाराच्या बाधित संख्येत वाढ होत असून नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वारंवार हात साबणाने धुणे तसेच गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved