Breaking News

BVG कंपनी च्या विरोधात युवासेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

नागपुर :- नागपुर शहरातील युवासेना पदाधिकारी यांचा तर्फे नागपुर महानगर पालिका आयुक्त मा.राधाकृष्णन यांना नागपुर शहरातील कचरा उचलणारी कंपनी BVG च्या विरोधात निवेदन देण्यात आले. सदर निवेदन युवासेना जिल्हा युवा अधिकारी हितेश यादव यांच्या मार्गदर्शनात व युवासेना शहर सचिव गौरव गुप्ता याच्या नेतृत्वात देण्यात आले.

युवासेनेने दिलेल्या निवेदनात आयुक्तांना सांगितले की, नागपुर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड च्या रस्त्यावर मोठे गाड्या जात अस्तानी त्यावर कचरा भरलेल्या गाड़ीवर ताडपतरी न झाकुन गाड्या नेत असतात आणि त्यामुळे प्रदूषण होते आणि तोच कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्या मुळे कचरा संकलन करणाऱ्या B.V.G.कंपनी ला दंड व योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी युवासेना पदाधिकारींनी केली.

तसेच रसत्याची दुर्दशा अतिशय खराब झालेली आहे ते ही लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. आयुक्तांनी मागणी पुर्ण करण्याचे आश्वासन दिले या वेळी प्रामुख्याने युवासेना शहर प्रमुख अक्षय मेश्राम, युवासेना उपजिलाधिकारी आकाश पांडे व निखिल शर्मा उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved