Breaking News

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांनी नाव नोंदणी करावी – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर दि. 5: भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या जिल्ह्यातील युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी उद्या रविवार दिनांक 6 डिसेंबर 2020 व शनिवार, दिनांक 12 डिसेंबर आणि रविवार दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी आहे. या विशेष नावनोंदणी मोहिमेंतर्गंत 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 15 डिसेंबर 2020 रोजी दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे.

या कालावधीत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले असून, 1 जानेवारी 2021 रोजी अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यांदीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या युवक-युवतींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपुर चे माजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या वडिलांचे निधन

केळापूर,( वर्धा) येथे रविवारी होणार अंत्यसंस्कार   नागपूर दिनांक ३० : आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त …

नागपुरात आढळले स्वाईन फ्लू चे १६ रुग्ण

नागपूर, ता. २७ : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved