Breaking News

संत जगनाडे महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर, ता.०८ : समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे,‍ स्थायी समिती सभापती श्री. ‍विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी व श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री. निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा आणि शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

संत जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हयातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावी झाला. त्यांनी संत तुकाराम महाराजांसोबत अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितले. संताजींची काव्य प्रतिभा विलक्षण होती.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, युवा आघाडी विदर्भ व संताजी नवयुवक मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री बलवंत मोरघडे, आशीष पेटकर, प्रमोद बारई, घनश्याम घोडमारे, नरेन्द्र हटवार, पंकज वंजारी, प्रविण बावणकुळे, शुभम वाघमारे, कमलेश चकोले, श्रावण डबरे, निलेश चांदेकर, गिरीश महाजन, सौ.निता लोंडे, गीता यरणे, नयना झाडे, सारिका ताटे, मंगला मस्के, मंजू कारेमोरे, मनीषा झाडे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर …

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved