
नागपूर- नागपूर च्या नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत एका 25 वर्षीय तरुणीवर चाकू ने हल्ला केल्याची घटना घडली असून युवती सध्या गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार सकाळी 10.30 च्या सुमारास घायल तरुणी आरोपी प्रशांत बरसागडे याला भेटायला आली असता काही कारणावरून त्याच्यात वाद झाला त्यामुळे आरोपी ने युवतीवर चाकू ने वार करून तिला गंभीर जखमी केलं. युवती व आरोपी परीचयाचे असुन काही महिन्या आधी तरुणी ने आरोपी सोबत बोलचाल बंद केलं होतं त्या मुळे रागाच्या भरात आरोपी प्रशांत ने पीडिता वर हल्ला केला. नंदनवन परिसरात घाडलेल्या या घटनेत आरोपी ला अटक करण्यात आल्याची माहिती नंदनवन पोलिसांनी दिली आहे.