Breaking News

महिलेचे लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथून जवळच असलेल्या रस्त्यावरील महाकुल्ला गावामधिल एका २४ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पिडीत विवाहित महिला ही आरोपी विक्रम रघुबल पाझारे (वय३३) रा. महाकुर्ला यांच्या शेतात शेतमजुरीचे कामकरीत होती. आरोपी विक्रम रघुबल पाझारे यांने तिला मी स्वतःचा जिव देऊन तुझ्यावर नाव आणतो अशी धमकी देत १० महिन्यापासून तिचे लैंगिक शोषण करीत आला.

त्याच्या अशा त्रासला कंटाळुन अखेर महिलेने सोमवारला घुग्घुस पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली असता पिडीत विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन घुग्घुस पोलीसांनी कलम ३७६ (२ ) एन ५०६ गुन्हे दाखल करुन आरोपी विक्रम रघुबल पाझारे (३३) याला सोमवारला रात्री दरम्यान अटक केली. आरोपीस मंगळवारला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.पुढील तपास पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सह.पो.नि.मेघा गोखरे करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved