Breaking News

महिला अभियंताने गळफास घेऊन केली आत्महत्या

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

भद्रावती: दिनांक 19. डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता कटारिया लेआउट मध्ये एका महिला अभियंताने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

माहिती आधारे असे की सोनाली सुरेश उईके (वय 32) असे मृतक युवतीचे नाव आहे. ती पुणे येथे वीप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी ती पुणे येथून सकाळी दहा वाजता भद्रावतीला आली होती. दुपारी चार वाजताच्या दरम्यान तिने घरीच छताच्या पंख्याला विद्युत इस्त्रीच्या केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सोनालीचे वडील सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 …

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved