Breaking News

सर्व प्रकारच्या दारूचे दुकान आज बंद – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

नागपूर दिनांक २७.. कोणाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तसेच कोरोना विषाणू वर प्रभावी व परिणामकारक नियंत्रणासाठी आज संपूर्ण जिल्ह्यात जनतेच्या सहकार्याने बंद पाळण्यात आला. जनतेनेही बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. *बंद मध्ये सर्व प्रकारच्या दारूच्या दुकानांचा ही समावेश राहणार आहे* त्यामुळे उद्या रविवारी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने सुद्धा बंद मध्ये राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.

नागपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे तसेच जनतेकडून कोरोना संदर्भातील प्रोटोकॉल पाळल्या जात नाही मोठ्या प्रमाणात लग्ना सह सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे त्यामुळे पालक मंत्री डॉ नितीन राऊत यांनी कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी विविध उपाय योजना लागू केल्या आहेत त्यामध्ये शनिवारी व रविवारी सर्व खाजगी व शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आलेले आहेत त्यासोबतच आठवडी बाजार सर्व दुकाने आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत आज बंद मध्ये सर्वच प्रकारची दुकाने तसेच कार्यालयांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला आहे उद्या सुद्धा बंद राहणार असून जनतेने कामाशिवाय बाहेर पडू नये असे आव्हान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

शनिवारी व रविवारी दारू दुकान बंद

जिल्ह्यात पुढच्या शनिवारी व रविवारी सर्व प्रकारचे दुकाने हॉटेल्स आस्थापना व कार्यालय बंद राहणार आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या दारू विक्रीच्या दुकानांचा सुद्धा समावेश राहणार आहे अशी माहिती सुद्धा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved