Breaking News

दहा झोन अंतर्गत ५१ नवीन लसीकरण केंद्र होणार सुरू होणार

नागपूर, ता.०५ :

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जास्तीत जास्त लसीकरण व्हादवे यासाठी मनपातर्फे दहाही झोन अंतर्गत एकुण ५१ नवीन लसीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. यापैकी १० लसीकरण केंद्र सोमवार (ता. ५) पासून सुरू करण्यात आले. २६ केंद्रांवर नियोजित मनुष्यबळ, डेटा एंट्री ऑपरेटर तसेच अन्य सोयीसुविधांची व्यूवस्था पुर्ण झाली आहे. उर्वरीत केंद्रावर लवकरात लवकर व्यावस्था करून या आठवड्यात सर्व लसीकरण केंद्र नागरिकांसाठी सुरू केली जाणार आहेत.
यात लक्ष्मीनगर झोन मध्ये ७, धरमपेठ झोन ७, हनुमाननगर झोन ५, धंतोली झोन ५, नेहरूनगर झोन ४, गांधीबाग झोन ५, सतरंजीपुरा झोन ३, लकडगंज झोन ५, आशीनगर झोन ४, आणि मंगळवारी झोन मधील ६ केंद्रांचा समावेश आहे. पुढच्या काही दिवसात हे सगळे केन्द्र सुरु करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले.
शहरात ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वर्ष वयापर्यंतच्या सर्व नागरिकांकरीता लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या अभियानाअंतर्गत सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधकृष्णन बी. यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही महापौर आणि अयुक्तांनी केले आहे.

झोननिहाय लसीकरण केंद्र
लक्ष्मीनगर झोन
१. श्री संत संताजी जगनाडे महाराज सांस्कृतीक भवन, राजीव नगर, प्रभाग क्र.३६
२. क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर, प्रभाग क्र. १६
३. समाज भवन, गजानन नगर, प्रभाग क्र. १६
४. सोनेगांव समाज भवन, दुर्गा मंदीर जवळ, सोनेगांव, प्रभाग क्र. ३६
५. स्केटिंग हॉल, हनुमान मंदिर जवळ, गायत्री नगर, प्रभाग क्र. ३७
६. महात्मा गांधी समाज भवन, शितला माता मंदिरच्या बाजुला सुभाषनगर, रींग रोड
७. मनपा शाळा, शिवणगांव, प्रभाग क्र.३८

धरमपेठ झोन
१. समाज भवन सभागृह, जगदीश नगर
२. दाभा मनपा शाळा, दाभा रिंग रोड
३. आयुर्वेदिक रुग्णालय तेलंखेडी, राम नगर
४. शितला माता मंदिर समाज भवन, सदर
५. समाज भवन, टिळक नगर
६. डिक दवाखाना, धरमपेठ व्ही.आय.पी. रोड
७. बुटी दवाखाना, टेम्पल रोड, सिताबर्डी

हनुमाननगर झोन
१. आझमशाह शाळा, शिव नगर, प्रभाग क्र. ३१
२. दुर्गा नगर शाळा, शारदा चौक, जुना सुभेदार, प्रभाग क्र. ३२
३. जानकी नगर, विठ्ठल नगर गल्ली नं. १, प्रभाग क्र. ३४
४. मानेवाडा UPHC, शाहू नगर, बेसा रोड, प्रभाग क्र. ३४
५. म्हाळगी नगर शाळा, म्हाळगी नगर, पाण्याच्या टाकी जवळ, प्रभाग क्र. २९

धंतोली झोन
१. साखळे गुरूजी शाळा, गणेशपेठ, प्रभाग क्र. १७
२. राहुल संकुल समाज भावन, गणेशपेठ, प्रभाग क्र. १७
३. सेंट्रल रेल्वे रुग्णालय, मनीष बेकरी, अजनी, प्रभाग क्र. ३५
४. गजानन मंदिर समाज भवन, दुलाबाई काचोरे ले-आउट, मनीष नगर, प्रभाग क्र. ३५
५. चिचभवन मनपा शाळा, चिचभवन वर्धा रोड, प्रभाग क्र. ३५

नेहरूनगर झोन
१. शीतला माता मंदिर समाज भावन, वाठोडा, गोपालकृष्ण नगर
२. शिवमंदिर समाजभवन, नंदनवन पोलिस स्टेशन जवळ
३. कामगार कल्याण कार्यालय, लतीका भवन,‍ चिटणिस नगर
४. इंदिरा गांधी समाजभवन, बिडीपेठ

गांधीबाग झोन
१. अन्सार समाजभवन, हाजी अब्दूल मस्जीद लिडर शाळे जवळ, प्रभाग क्र. ८
२. भालदारपुरा UPHC, गांजीपेठ रोड, अग्निशमन विभागाजवळ, प्रभाग क्र. १९
३. नेताजी दवाखाना, पटवी मंदिर गल्ली, टिमकी, प्रभाग क्र. ८
४. दाजी दवाखाना, शहिद चौक, इतवारी, प्रभाग क्र. २२
५. मोमिनपुरा मनपा शाळा, मोमिनपुरा, प्रभाग क्र. ८

सतरंजीपुरा झोन
१. जागनाथ बुधवारी प्रा. मुलींची शाळा, भारतमाता चौक
२. मेहंदीबाग प्रा. शाळा, बाराईपुरा, लालगंज
३. कुंदनलाल गुप्ता नगर मनपा शाळा, कुंदनलाल गुप्ता नगर

लकडगंज झोन
१. भरतवाडा प्रा. शाळा, भरतवाडा रोड, प्रभाग क्र. ४
२. सतनामी नगर समाजभवन, सतनामी नगर, आंबेडकर चौक, प्रभाग क्र. २३
३. मिनिमाता नगर प्रा. शाळा, मिनीमाता नगर, प्रभाग क्र. २४
४. पारडी मनपा प्रा. शाळा, सुभाष चौक पारडी, प्रभाग क्र. २५
५. कळमना मराठी प्रा. शाळा, जुना कामठी रोड, कळमना, प्रभाग क्र. ४

आशीनगर झोन
१. वैशालीनगर हिंदी उच्च प्रा. शाळा, वैशालीनगर बसस्टॉप, प्रभाग क्र. ६
२. वांजरी हिंदी प्रा. शाळा, विनोबा भावे नगर, प्रभाग क्र. ३
३. ललितकला भवन, ठवरे कॉलनी, प्रभाग क्र. २
४. एम.ए.के. आझाद हिंदी उर्दु शाळा, आशीनगर, प्रभाग क्र. ७

मंगळवारी झोन
१. शक्यमुनी समाजभवन, भीम चौक, नागसेन नगर,
२. संत रामदास धरमशाळा, जरीपटका
३. सेंट जॉन प्रायमरी स्कुल, मोहन नगर,
४. बोरगांव हिंदी प्रा. शाळा, पटेल नगर, गोरेवाडा रोड
५. प्रशांत नगर मनपा ऊर्दु उच्च शाळा, जाफर नगर
६. गोरेवाडा UPHC गोरेवाडा, नागपूर

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक …

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved