
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस लावणे सुरू आहे याबाबतीत नागरिकांच्या मनात अनेक भ्रम आहेत. त्याकरिता कापसी खुर्द चे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका थेट
गावा गावात फिरून कोरोना लसीकरण बाबत जन जागृती अभियान राबवत आहे. तसेच नागरिकांना पटवून सांगत आहे की लस लावल्याने शरीराला कोणतेही दुष्परिणाम होत नाही 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी लस लावणे आवश्यक आहे लस लावल्याने कोरोना विरुद्ध लढण्याकरिता शरीरात ऊर्जा निर्माण होते.
जन जागृती अभियानाची सुरुवात कापसी खुर्द येथील घरसंसार नगर येथून करण्यात आली या अभियानात सरपंच सुरज पाटील, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख, ममता बांगडे, आशा सेविका आम्रपाली पाटील, अंगणवाडी सेविका रजनी पारधी, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत सहभागी होते.