
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून १६ आगस्ट शहिद दिनाचे औचित्य साधून चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस सुरु करण्यात आली.
शहीद विरांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ३० वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रांतिकारी संघटनेने चिमूर आष्टी क्रांती एक्सप्रेस एस टि बस फेरी सुरु करून चिमूर आष्टी क्रांतीभूमीचा इतिहास जिवंत केला.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, जिल्हाध्यक्ष सांरग दाभेकर, आगार सहायक इम्रान शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोकारे, प्रफुल्ल कावरे यांनी हिरवी झेडीं दाखवून शुभारंभ केला. आणि चिमूर आष्टी क्रांती एक्स्प्रेसने आष्टी क्रांती भूमीकडे रवाना झालेत.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरीफ वारसी, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, तालुका उपाध्यक्ष सय्यद नासीर अली, कैलास भोयर, विलास मोहिनकर, महिला तालुका अध्यक्षा सत्वशिला खोब्रागडे, नागभिड शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर, ज्ञानेश्वर शिरभय्ये, विक्की मेश्राम, प्रितेश रामटेके व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते. चालक – कनड्रायव्हर यांनी एक्सप्रेस एस टि बस चालविण्याचा बहुमान मिळविला. बहुसंख्येने प्रवास्यांनी एक्सप्रेसचा लाभ घेतला. भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर विभागाचे आभार मानले.