Breaking News

स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पारडपार व खापरी रसत्याकडे दुर्लक्ष

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- दि १८ऑगस्ट २०२१ पारडपार-खापरी रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व या गंभीय संस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे खूप मोठे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी पारडपार-खापरी मार्गाची त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे व जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व हे रास्तावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत या रस्ताने पारडपार येथिल शेतकरी व शेतमजुर जाणे-येणे करीत असतात व हा मार्ग पारडपार वरून जांभुळघाट व खापरी वरून चिमूरला जाणारा मुख्य मार्ग आहे व या मार्गाने शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवास करीत असतात मात्र या रसत्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे तरी पारडपार-खापरी रस्त्याची त्वरित उपपयोजना करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमूर येथे देण्यात आले यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे ,व सरपंच संघाचे चिमुर तालुका अध्यक्ष व उपसरपंच वैभव ठाकरे , व सम्यक चे पदाधिकारी निलेश गावंडे , निखिल रामटेके , संदीप बन्सोड ,सुरज धुर्वे व पारडपार येथील शेतकरी ऋषिकेश मोटघरे , शैलेश मेश्राम विवेक मेश्राम , प्रतीक वाघमारे , स्वप्नील गजभे , चंद्रशेखर गजभे निकेश केराम , नागसेन गणवीर ,उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 11 नामनिर्देशन पत्र दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 मार्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved