
नगर परिषद चा ठराव पडला धूळखात
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्रांती शहर प्रसिद्ध असून या शहरात आगमन प्रसंगी चार मुख्य सीमेवर स्वागत गेट निर्माण करण्याचा ठराव नप च्या सभेत मंजूर करण्यात आले असतांना सुद्धा ठराव धूळखात पडला असून स्वागत गेट निर्माण करण्याची मागणी नप माजी सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे.
चिमूर शहरात खडसंगी, मासळ, भिसी, कांपा व नेरी कडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आहेत. चिमूर जवळ ताडोबा व्याघ्र प्रकल्प असून देशासह जगातील पर्यटक चिमूर वरून जात असतात तेव्हा त्या पर्यटक किंवा बाहेरून येणाऱ्या अतिथींना चिमूर ची ओळख व्हावी यासाठी स्वागत गेट असणे आवश्यक आहे . यासाठी नप च्या सभेत ठराव मंजूर करण्यात आलेला होता परंतु त्या ठरावाकडे दुर्लक्ष केले जात आहे.चिमूर क्रांतीचे महत्व कळावे आदी विषयासाठी चिमूर येथे पाच स्वागत गेट निर्माण करण्याची मागणी नप माजी सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे.