
प्रतिनिधी नागपूर
नागपूर:- पोलीस स्टेशन पारडी येथील नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके साहेबांचे स्वागत कापसी (खुर्द) गावातील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके, ग्रामपंचायत सदस्य नारायण (पिंटु) दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांच्या वतीने करण्यात आले।
मनोहर कोटनाके यांचे पारडी पोलीस स्टेशन हद्दीत येणारे कापसी खुर्द गावातील नागरींका सोबत जवळचे नाते आहे, सन २००५ ते २००९ या काळात मनोहर कोटनाके हे कापसी खुर्द येथील पोलीस निरीक्षक पदावर राहुन उत्तम कामगिरी केलेली आहे, त्यांची कामगिरी आज ही येथील नागरीक विसरलेले नाही, कोटनाके पारडी पोलीस स्टेशन ला रुजु होताच येथील नागरीकांनी त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला धाव घेतली!
आज मंगळवारी कापसी खुर्द येथील माजी पोलीस पाटील प्रभाकरजी पिल्लारे, उपसरपंच अक्षय रामटेके ग्रामपंचायत सदस्य नारायण दुनेदार, युवा नेतृत्व सुशील रहांगडाले यांनी सुद्धा नवनियुक्त पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांची भेट घेवुन शुभेच्छा दिल्या!