Breaking News

नवनियुक्त ठाणेदार मनोज गभने स्विकारतील चिमूर पोलिस स्टेशनचा पदभार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चिमूर :- चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्हातंर्गत पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून प्राप्त अधिकृत माहितीनुसार चिमूरचे ठाणेदार आर. एम. शिंदे यांची बदली जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे झाली असून चिमूरचे ठाणेदार म्हणून एम. सि. गभने रुजू होतील. सध्या ते भिसी ठाणेदार पदावर कर्तव्य बजावत आहेत.
दि.२५ ऑगस्टचे बदली (पदस्थापना) आदेशानुसार पोनी. प्रविणकुमार पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथून वाहतूक शाखा, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली तर गडचांदूरचे ठाणेदार जी व्ही भारती यांची भद्रावतीचे ठाणेदार म्हणून पदस्थापना होणार आहे
भद्रावती चे ठाणेदार सुनिलसिंह पवार आता मानव संसाधन विभाग, चंद्रपूर मध्ये जबाबदारी स्वीकारतील. जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर येथे कार्यरत सत्यजित आमले हे गडचांदूर ठाणेदार पदाची जबाबदारी स्विकारतील.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved