
प्रतिनिधी नागपूर
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा नागपूर येथील छत्रपती चौकात ट्रकला मागुण दिलेल्या धडकेमुळे अपघात झाला असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र या अपघातात सुरक्षित असुन ते प्रवास करत असलेले वाहन कुठेही धडकले नाही.
सविस्तर वृत्त असे की, काल रात्रीच्या वेळेस सोनेगाव येथुन कार्यक्रम आटोपून परत येत असताना हा अपघात झाला. वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी आपल्या ताफ्यासह घरी परत असताना त्यांच्या ताफ्यासमोर एक ट्रक होता. छत्रपती चौकात सिग्नल बदलून लाल झाल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे मागुण येणाऱ्या ताफ्यातील सर्वात समोरचे वाहन क्रमांक MH01 CP2435 या वाहनाने ट्रकला मागुण जोरदार धडक दिली.