
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल परिसरात एका ईसमाचे कुजलेल्या अवस्थेत प्रेत
आढळून आले. सविस्तर माहितीनुसार
खेमराज सखाराम कापसे वय ५४ रा. कोटगाव , ता. चिमूर हल्ली मुक्काम टाकळघाट जि. नागपूर असे मृतकाचे नाव असून ते शेतीच्या कामासाठी टाकळघाट वरुन कोटगावला येण्यासाठी निघाला होता, दि. २४/०८/२०२१ ला त्याने उमरेड ला असल्याचे घरी फोनवर सांगितले होते, दि. २९/०८/२०२१ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास कान्पा ते बनवाई रोडच्या डाव्या बाजूला झुडपी जंगल शिवारात त्यांचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत संबंधित वनरक्षकाला दिसले, वनरक्षकांनी तात्काळ पोलीस स्टेशन नागभीड येथे माहिती दिली. नागभीड पोलीसांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली, मृतका जवळ निवडणूक कार्ड आढळून आले त्यामुळे ओळख पटवून नातेवाईकांना माहिती दिली असता मृतकाचा मुलगा अक्षय याने घटनास्थळी येऊन ओळख करून घेतली व शवविच्छेदन करीता प्रेत ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाढीवा करीत आहेत.