
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
नागभीड :- नागभीड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवखळा जिल्हा परिषद शाळेची चक्क खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य चोरी करणाऱ्या,
तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तिन्ही आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दि. ४ सप्टेंबरला सायंकाळी संबंधित मुख्याध्यापक शाळेला कुलूप लावुन आपल्या घरी गेले असता, त्याच दिवशी मध्यरात्री ११ वाजताच्या सुमारास गावातीलच ललित आकाश नान्हे व बाल्या परमानंद अलमस या युवकांनी नवखळा जिल्हा परिषद शाळेतील संगणक असलेल्या खोलीची खिडकी तोडून शाळेतील संगणक साहित्य व एलईडी असे सामान चोरीस गेल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलीसांना दिली.
पोलीस घटनास्थळ गाठून तपासाचे चक्र फिरवुन तिन्ही आरोपीला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात मनोज फत्रु यांच्या घरी चोरी गेलेले काही साहित्य आढळून आले, पुन्हा चोरी गेलेले काही साहित्य अजूनही पोलीसांच्या हाती लागायचे आहेत. आज तिन्ही आरोपीना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, पुढील तपास सुरू आहे.