Breaking News

हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीला केली अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

रासा :- निलेश चौधरी हा युवक दिनांक २७ ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता व त्याचा मृतदेह दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगल परिसरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे निलेशची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. पोलीसांना तपासाअंती आज दिनांक १६ सप्टेंबर गुरुवारला हत्या असल्याचे स्पष्ट झाले असता चार आरोपीसह एका विधिसंघर्ष बालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक २७ ऑगस्टला निलेश सुधाकर चौधरी (वय ३२) राहणार रासा येथील आपल्या घरून बेपत्ता झाले असल्याची तक्रार वणी पोलिसात दिनांक २८ ऑगस्टला सायंकाळी देण्यात आली. दिनांक २९ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या सुमारास निलेशचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत रासा येथील फुलोरा जंगलात आढळून आला. मृतकाची बहिण सीमा मोहन गाडगे हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम ३०२, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वणी पोलिसापुढे आत्महत्या की घातपात असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी तपास यंत्रणेला गती देत चार आरोपीसह एका विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान हत्या केल्याचे निष्पन्न झाले पुढील तपास सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved