
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर : – केंद्र सरकारने सुशिक्षित बेरोजगारास दिलेल्या वचनाची पूर्ती न करता देशातील तरूणांची बेकारीची समस्या वाढविण्याचा घाट रचून तरुणांच्या आयुष्याची वाट लावली असे चित्र सर्वत्र दिसून येत असून सुद्धा या केंद्र सरकारला जाग येत नाही. म्हणून दिनांक १५/०२/२०२१ ला राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्य शिवानी विजय वडेट्टीवार, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वात केंद्रसरकारनी बेरोजगारांना वचनाची पुर्ती न करता त्यांच्या समस्येमध्ये वाढ करून तरुण पिढीस बेरोजगारांच्या खाईत ढकलून त्यांच्या आयुष्यांची वाट लावण्याचे कुकर्म केले असे कृत्य करणाऱ्या या केंद्र सरकारच्या हुकुमशाही, मनमानी व हेकेखोर वागणुकी विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व भाजप प्रणील पक्षांनी निवडणुक जिंकण्याकरीता जाहीर भाषणामधुन मोठ – मोठी आश्वासने दिली व तरुणपिढीस नौकरी लावुन देण्याचे आश्वासन दिले आणि आपणाकडे आकर्षित केले. परंतु ५ वर्षे लोटुन सुद्धा तसेच दुसऱ्यांदा सत्तेत असतांना सुध्दा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला गेला नाही. रोजगार न मिळाल्यामुळे तरुणांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आणण्याचे काम या खोटारडया सरकारने केलेले आहे. केंद्र सरकारचे धोरण हे मनमानी असून देशातील तरुण कुठे भस्कटलेला आहे याकडे यांचे दुर्लक्ष होत आहे. तरुणांच्या बेरोजगारांची समस्या न सोडविता नौकरीचे आमीष दाखवून तरुणांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम है केंद्र सरकार करीत असल्याने केंद्र सरकारचे धोरण तरुण पिढीला बेरोजगार करून त्यांचे आयुष्य संपविण्याचे काम करीत आहे.
भाजपा प्रणीत सरकारला सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्येविषयी काहीही देणे-घेणे नसून आपली राजकीय पोळी सेकून घेवून त्यातच धन्यता वाटत आहे. सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे आमीष दाखवून त्यांना रोजगार देण्याविषयी आस्था नाही. सरकार बेरोजगारांच्या समस्येविषयी आंधळे आहोत अशा पध्दतीने बेरोजगारांची थट्टा करीत आहेत.केंद्र सरकारने स्वतःच्या व स्वतःच्या पक्षाच्या स्वार्थाकरिता बेरोजगार तरुणांना वापर करून वाममार्गाने नेण्याचा गोरखधंदा उचललेला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या वचनाची फी बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात यावी या करीता केंद्र सरकारचा निषेध म्हणून बेरोजगारी असलेला अनावस्थे विषयीच्या कुकर्माचा भंडाफोड करण्याकरीता राष्ट्रीय रोजगार दिनाचे औचित्य साधुन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन तहसीलदार कोवे यांच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहचवाल असे युवक काँग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संदिप कावरे चिमूर विधानसभा अध्यक्ष,गजानन बुटके जि. प.सदस्य , जावा शेख अल्पसंख्याक अध्यक्ष , नितीन कटारे अध्यक्ष नागभीड तालुका युवक काँग्रेस ,श्रीकृष्ण जिल्हारे विधानसभा अध्यक्ष सोशल मिडिया , तुषार शिंदे माजी उपाध्यक्ष नगर परिषद चिमूर , नितीन कटारे माजी नगरसेवक नगर परिषद चिमूर , उमेश हिंगे माजी नगर सेवक न.प.चिमूर, राजू दांडेकर ,अमेय नाईक , राकेश साटोने , वतन सहारे , संजय वाकडे ,हरिष कामडी, शेखर राऊत,प्रगत सहारे,वैभव निकुरे,अमित लोखंडे, सुनील शेंडे,संजय किरिमकर, भास्कर चौधरी,अस्पाक शेख,राजेंद्र गायकवाड, सूरज नन्नावरे, बबलू शेख,विकास पेंदाम,निखिल डोईजड , बंटी शिंदे ,प्रमोद दांडेकर व आदींची उपस्थिती होती.