
विषेश -प्रतिनिधी
आरमोरी :- आई-वडील घरी नसल्याची संधी साधून ३ आरोपींनी एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना दिनांक १४ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल या गावात घडली. फिर्यादी व पीडित तरुणीने आरमोरी येथील पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी ३ आरोपीला अटक केली असून यात राकेश जनार्धन सावसाकडे (वय २५), अंकुश कालिदास कोटांगले (वय २२), भुपेश विनायक जराते (वय १८) हे राहणार चामोर्शी माल ता. आरमोरी असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
आरमोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ सप्टेंबरला पिडित तरुणीचे आई-वडील घरी हजर नसताना आरोपी राकेश सावसाकडे व त्यांचे दोन मित्र अंकुश कोटांगले व भुपेश जराते हे तिघेही जण फिर्यादीचे घरी येऊन पिडित तरुणीची लहान बहीण व पिडितेचे तोंड दाबून आरोपी राकेश याने पिडितेस पलंगावर पाडले व तिचे सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात पिडित तरुणीची मोठी आई व बाबा घरी धावून आल्यामुळे तिन्ही आरोपीनी तिथुन पळ काढला.
पिडित तरुणीची आई व वडील दिनांक १५ सप्टेंबरला घरी परत आल्यानंतर पिडितीने त्यांना आपबीती सांगितली. व सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास पिडित तरुणीची आई व वडील आरोपी राकेश सावसाकडे याला जाब विचारण्यास गेले असता, आरोपी राकेश याने तिच्या वडिलांच्या अंगावर धावून लाता बुक्क्यांनी मारहाण केली. व पिडितेने मध्यस्थी केल्याने तिला सुद्धा मारहाण केले. फिर्यादी तथा पिडित मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी
आरोपीविरोधात
भांदवी ३५४,३५४(अ), (१) (i), ३४, ४५२, ३२३ सहकलम ७, ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अनवये गुन्हा दाखल करून अटक केली. आज दि. १७ सप्टेंबरला गडचिरोली येथील जिल्हा न्यायालयात आरोपींना नेले असता त्यांना दिनांक १८ सप्टेंबर पर्यंत एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, पोलिस उपनिरीक्षक कांचन उईके, सहा. फौजदार देवराव कोडापे करीत आहेत.