
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोज शुक्रवारला उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय चिमूर येथे देशात वाढलेली बेरोजगारी या समस्सेबाबत युवा काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्री निवास तसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे साहेब यांचे आदेशानुसार ठरल्याप्रमाणे अविनाशभाऊ वारजूकर, माजी आमदार तथा माजी खनिकर्म मंत्री महाराष्ट्र शासन तथा विद्यमान जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सतिषभाऊ वारजूकर,
माजी. जि प. अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य गटनेता जि.प. चंद्रपूर तथा विधानसभा समन्वयक चिमूर विधानसभा काँग्रेस कमिटी यांचे मार्गदर्शनातून प्रशांत डवले, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर यांच्या नेतृत्वात युवा आक्रोश दर्शविण्यात येऊन नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला बेरोजगार दिवस म्हणून केंद्र सरकारवर हल्ला बोल करून निषेध करण्यात आला.
यावेळी गौतम पाटील अध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस चिमूर, प्रशांत डवले अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर, मंगेशजी रंदये सरचिटणीस युवक काँग्रेस चिमूर, अविनाश अगडे जि. महासचिव युवक काँग्रेस चंद्रपूर, मंगेशजी घ्यार, महासचिव विधानसभा यु.काँग्रेस चिमूर, शांतारामजी सेलेटकर माजी. उपसभापती तथा विद्यमान गटनेता पं.स.चिमूर, सुभाषजी करारे माजी. सरपंच मानेमोहाळी तथा काँग्रेस कमिटी सदस्य चिमूर, प्रमोदजी राहुड जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता शंकरपूर, अमितजी मेश्राम सहसचिव यु.काँग्रेस चिमूर, परमानंद गुरनुले, सरपंच ग्रा.पं. मदनापूर, मनोज खेटमाली डोमा पं.स.सर्कल अध्यक्ष यु.काँ.चिमूर, कपिल वैरागडे, गजानन मसराम ग्रामध्यक्ष महालगाव यु.काँ.चिमूर, सुधाकर भरडे, निखिल पंधरे आदी युवक काँग्रेस कार्यकर्ता यांचे उपस्थित हल्ला बोल करून केंद्रसरकारचा निषेध करण्यात आला.