
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी येथील एम एस इ बी कर्मचारी हे कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत बिलधारकांची घरघुती वीज जोडणी कापत आहेत. पूर्वसूचना तर दूरच, घरी कोणी हाजर नसताना सुद्धा हे कर्माचारी वीज कापणी चे काम करीत आहेत. एखादा गरीब व्यक्ती ज्याने आर्थिक अडचणीमुळे वीज बिल भरले नसेल , बिल ९०० ते १००० रुपयापर्यंत असेल तरी एमएसइबी कर्मचारी त्या व्यक्तीस कोणतीही पूर्वसूचना न देता व त्या व्यक्तीच्या घरी कोणी हाजर नसेल तरीसुद्धा त्या घरची वीज कापून टाकतात.
हे कर्मचारी इथेच थांबत नाहीत तर जर तो व्यक्ती बिल भरण्यासाठी गेला असता त्यास पुन्हा वीज जोडून देण्यासाठी २४० रुपये जास्तीचे भरावयास सांगतात. असा मनमानी कारभार नेरी एमएसइबी चे कर्मचारी करीत आहेत. एखाद्या व्यक्तीने बिल भरले नसेल व पूर्वसूचना दिल्यावर किंवा वीज कापायला गेल्यावर जर तो व्यक्ती बिल भरण्यास तयार असल्यास वीज कापता कामा नये असे आहे. व त्याला २४० रुपये जास्तीचे लागणार नाही असेही आहे. तरीपण हे कर्मचारी त्यांची घरघुती वीज कापतात आणि मग ती लावून देण्यासाठी २४० रुपये जास्तीचे घेतात. त्यामुळे नागरीकांत संभ्रम व संताप निर्माण झालेला आहे.
अशा सर्व कर्मचाऱ्याणवर कारवाही करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. एखाद्याने खांबावरच्या वीज बिघाडासाठी अथवा कोणत्याही कामासाठी एमएसइबी ला तक्रार जर केली तर हेच कर्मचारी दोन ते तीन दिवसानंतर येण्याची कृपा करतात. त्यामुळे गरीब लोकांना अंधारात दिवस काढावे लागतात. जे लोक खर्च करू शकतात त्यांना गावातला एखादा इलेक्ट्रिशियन बोलावून पैसे देऊन काम करवून घ्यावे लागते. आधीच वाढते बिल, व त्यात सर्व सेवांचे कर भरले असता सुद्धा वेळेवर सुविधा मिळत नाही.
लाईन सुद्धा खूप वेळ जाणे येणे होत असते. तरी सर्व कर भरूनही पूर्ण वेतन जो या कर्मचाऱ्यांना मिळतो तो कशासाठी? तक्रार निवारणाचे सुद्धा लेबर चार्ज म्हणून हे कर्मचारी पैसे कसे घेतात? असे गावकरी विचारत आहेत. म्हणून योग्य वेळेत हा नेरी एमएसइबी चा मनमानी कारभार थांबला पाहिजे व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाही झाली पाहिजे अशी चर्चा नेरी वाशिय जनतेत सुरू आहे .