Breaking News

दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट

भारतीय हवामान खाते यांचा सतर्कतेचा इशारा

दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी चा इशारा

नागपुर:-भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधी साठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देत बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर जिल्हयात काही ठिकाणी वादळीवाऱ्या सह विज व अतिवृष्टी चा इशारा दिला आहे.

तसेच जिल्ह्यातील धरणाची पातळी देखील भरपूर प्रमाणात भरेलेली असून या अनुषंगाने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर यांचे द्वारे करण्यात येत आहे.

धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस व आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवकामुळे पुर परिस्थिती लक्षात घेता द्वारे असणारे मोठे धरणाचे वक्रव्दार (गेट) केव्हाही उघडण्यात येवू शकतात.व द्वारे नसणारे धरणातील पाणी साठा १०० % पेक्षा जास्त झाल्यावर नदि/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार असल्याकारणाने नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसेच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना व नदी पात्रातून आवागमण करणा-या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

🛑 भारतीय हवामान खाते, जिल्हा प्रशासन तसेच विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या हवामान अंदाज व धरण बाबत स्थिती व पाण्याचा विसर्ग यावर कटाक्ष ठेऊन सतर्क रहावे.

🛑कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका

🛑 नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा

🛑 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.

🛑 जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका.

🛑 नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

🛑 अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका

🛑 धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका

🛑 घडलेल्या घटनेची / आपत्ती ची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी

नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्र. १०७७

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved