
वर्धा /सावली :-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी व कृषिदुत *पवन हरिभाऊ झाडे* याने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 अंतर्गत गाव -सावली येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना विविध प्रात्याक्षिक देऊन मार्गदर्शन केले .त्यामधे आधुनिक सिंचन सामग्री , एकात्मिक तण व्यवस्थापन ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन,
फळबाग लागवड व्यवस्थापन,कलमे,रोपवाटिका व्यवस्थापन, जैविक खतांचे महत्त्व ,अन्यद्रव्य कमतरता व उपायोजना, सूक्ष्मअन्नद्रव्ये व संजीवक यांचे वापर, बोर्डो मिश्रण, फवारणी करताना घेण्याची काळजी,खत व्यवस्थापन, बियाण्यांचे प्रकार,कृषी विषयक योजना व तसेच दूधउत्पादन, जनावरांची काळजी आणि देखभाल,तसेच महिलांना धान्याची साठवून करणे, खाद्यपदार्थ बनवून त्याचे जीवनमान वाढवून त्याची साठवणूक करणे, दुग्धजन्य पदार्थ करणे,शेतमालावर प्रक्रिया करणे इ. याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवत माहिती दिली.तंत्रज्ञान शेती यातील नवनवीन संकल्पना याविषयावरील मार्गदर्शन केल्यानंतर सावली गावातील ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी अभिनंदन केले.
सध्याचा कोरोना विषाणूच्या काळामध्ये हा कृषी कर्यानभुव कार्यक्रम घरीच योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना मा. सहयोगी अधिष्ठाता डॉ यू.बी होले सर यांनी दिल्या आहेत. चेअरमन डॉ एस. आर. कराड सर , कार्यक्रम समन्वयक डॉ बी. टी. कोलगणे सर, कार्यक्रम आधिकारी डॉ. डी. एस. पोतदार सर तसेच सर्व विषयतज्ञ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रात्याक्षिके व्यवस्थतीत केली