
दुर्गापूर पोलीसांनी पाच आरोपीला घेतले ताब्यात
जिल्हा प्रतिनिध -सुनिल हिंगणकर
दुर्गापूर :- पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांना माहिती मिळाली की वरवट येथील शेतशिवारात कोंबडा बाजार खेळवल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून कार्यवाही करीत पाच आरोपींना ताब्यात घेतले.
अप.क्र. 233/2021 कलम 12(ब) मजुका आरोपी
1) नंददिप विजय श्रीखंडे वय 30 वर्ष रा.येरुर पो. ताडाली ता.चंद्रपुर 2)महादेव गुलाब कासवटे वय 26 वर्ष रा.रा.येरुर पो. ताडाली ता. चंद्रपुर
3)राजकुमार दामोदर खारकर वय 42 वर्ष रा. खैरगाव ता. चंद्रपुर
4)रवि सुरेश निंदेकर वय 30 वर्ष रा. बालाजी वार्ड चंद्रपुर
5)नाजीम छोटू शेख वय 19 वर्ष रा. दुर्गापूर वार्ड क्र 3 रा. ता.जि.चंद्रपूर
पाहीजे आरोपी1) अभिमान रायपुरे वय अंदाजे 35 वर्षे रा. वरवट ता. जि. चंद्रपुर अशी आरोपीची नावे असून ही घटना दि.26/09/21 ला 16/30 वा.ते.17/30 वा.दरम्यान घटली असून आरोपींची अंगझडतीत घेतली असता त्यांच्या कडुन नगदी 11,700/ रु., 5 नग कोबंडे (पैकीे 2 मरण पावलेले) किंमत 1500/रु., 4 लोखंडी कात्या किंमत 400/रु.,
3 नग मोबाईल किंमत 15,500/रु. आणि 3 मोटर सायकली ज्याची किंमत 17,0000/रु. असा एकुण 1,99,100 /रु.चा माल जप्त करण्यात आला आहे.
पुढील कार्यवाही पो.नि.स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी प्रविण सोनोने, पोहवा सुनिल गौरकार/785
पोहवा.अशोक मंजुळकर/1870
नापोशी.जयसिंग जाधव/2145
पोशि. मनोहर जाधव/931
पोशि.मंगेश शेंडे/1074
पो.स्टे. दुर्गापूर करीत आहे.