
-चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद-
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी चिमूर येथे शेतकरी समर्थनार्थ भारत बंद ला कांग्रेसचा पाठिंबा व चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले,केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी कामगार, छोटे व्यावसायिक,सुशिक्षीत युवक,गोरगरीब जनता विरोधी सरकार असुन शेतकरी समस्या ,महागाई बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले आहे.शेतकऱ्यांना उध्दवस्य करणारे तीन काळे कृषि कायदे,कामगार विरोधी कायदे,वाढती बेरोजगारी,इंधन दरवाढ ,गैस, खाद्य तेल,दरवाढ व महागाईच्या मुद्यांवर जनतेत तीव्र असंतोष आहे.
देशातील जनता समस्यांचा सामना करत असतांना झेपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस यांच्या सूचनेनुसार डॉ. अविनाशभाऊ वारजुकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी, यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ सतिषभाऊ वारजुकर चिमुर विधानसभा समन्वयक यांचे सूचनेनुसार व तालुका अध्यक्ष संजयजी घुटके, कार्याध्यक्ष विजय पाटील गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ पूर्णे पणे बंद करून मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांचे मार्फत मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संजयजी घुटके,कार्याध्यक्ष विजय पाटील गावंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोदजी मुरकुटे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद बारापात्र,आणि अनिल रामटेके, चिमुर शहर कांग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे,जेष्ठ कार्यकर्ता धनराजजी मालके, तालुका कांग्रेसचे उपाध्यक्ष राजु चौधरी, डॉ. रहेमान पठाण,तालुका महिला कांग्रेसच्या अध्यक्षा सौ सविताताई चौधरी, चिमुर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौतम पाटील, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत डवले ,तालुका कांग्रेस महिला अल्पसंख्याकसेल चे अध्यक्षा नाजेमा पठाण, पं स.चिमुर चे उपसभापती रोशन ढोक,माजी सरपंच बाळूभाऊ बोभाटे, रामदास चौधरी, नागेश चट्टे,पप्पु भाई शेख, पळसगाव ग्रा.पं. चे सदस्य सोनेकरजी,मंगेश घ्यार, प्रविण जिवतोडे,वणीताताई मगरे,ममताताई भिमटे, दिक्षाताई भगत,शहणाज अन्सारी,इत्यादी उपस्थित होते.