
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथील इंदिरा नगर वासियांना घराच्या व जागेचा मालकी हक्काचे कायम स्वरूपी पट्टे द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती. जिल्हाधिकारी साहेब यांनी मागणीची दखल घेऊन ६/८/२०२१ ला उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे आदेश दिलेले आहे.
इंदिरा नगर वासियांना घराच्या व जागेच्या मालकि हक्काचे कायम स्वरुपी पट्टे देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या पञानुसार कार्यवाही का केली नाही,
विनाविलंब तात्काळ कार्यवाही करा असे भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी निवेदनाद्वारे म्हटले.येत्या सात दिवसांत कसलीही कार्यवाही न केल्यास भारतीय क्रांतिकारी संघटना इंदिरा नगर वासियांच्या न्याय हक्कासाठी उग्र आंदोलन करेल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.
निवेदन देताना भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, जिल्हा प्रमुख सांरग दाभेकर, नंदकिशोर अंबादे, बाबुराव दिघोरे, सुधाकर बारेकर , दिव्यांग कार्यकर्ते माजी तालुकाध्यक्ष योगेश रामटेके, डॉ.देव,सुभाष नामपल्लीवार, विलास मोहिनकर व इंदीरा नगर वासिय उपस्थित होते.