
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमुर तालुक्यातील अगदी जवळच असलेल्या खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.३०-९-२१ रोजी भव्य रोगनिदान शिबीर पार पडले
भारत देशाच्या स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर चे वतीने या रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष रेखा ताई कोरेकार जि.प.सदस्य तथा उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले,
या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणुन मा. अजहर जी शेख,पुंडलीकजी मत्ते पंचायत समिती सदस्य चिमुर , डॉ. दिगंबर मेश्राम तालुका आरोग्य अधिकारी, रवी सोरदे आरोग्य विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती,याप्रसंगी मान्यवरांनी आरोग्य बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.शिबीरात १९७ स्रि पुरुष रुग्नांनी तपासणी करून शिबीराचा लाभ घेतला या आरोग्य शिबीराचे प्रास्ताविक श्रीकांत रणदिवे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी यांनी केले शिबीराचे संचालन विजय सोनुने आरोग्य सहाय्यक यांनी केले, आभार आरोग्य सहाय्यीका तामगाडगे मँडम यांनी मानले या शिबीराचे यशस्वीतेसाठी डॉ. कांचन धारणे वैद्यकीय अधिकारी, नागोसे नेत्र चिकित्सक, धनंजय पजाई , कु. आगरकर सी एच ओ व आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.