
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नेरी वरुन म्हसली मार्गे नंदारा जवळ सायंकाळी 6.30 च्या सुमारास ट्रॅक्टर ट्राली शेतात पलटून दोन व्यक्ती (शेतमजूर) गंभीर जखमी असून एक किरकोड जखमी झाल्याची घटना घडली,
सविस्तर वृत्त असे की, चिमूर तालुक्यात धान बांधणीचा हंगाम जवळ आलेला असून धान बांधनासाठी शिंदीची आवश्यकता असून सिंदी आनण्यासाठी नंदारा येथील जवळपास 10 ते 15 शेतमजूर ट्रॅक्टर घेऊन गेले आणि त्यांनी शिंदी भरून ट्रॅक्टर परत नंदारा मार्गाने गावाकडे परत येत असताना नेरी- म्हसली मार्गाजवळ ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले व ट्रॅक्टर गोसावी देवाजवळ रोडला लागून
असलेल्या धाणाच्या बांधीत पलटी झाला. व त्यामध्ये शेतमजूर खाली दबल्या गेले, जवळपास असलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि सर्व मजुरदारांना बाहेर काढण्यात नागरिकांनी मदत केली व जखमी मजुरदारांना नेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले डॉ सतीश वाघे यांनी पेशंट ला प्राथमिक उपचार करून नेरी येथील आरोग्य केंद्रातील गाडीने चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.